अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसमुळे बारावीचे कॉलेज सुरू झालेले नसताना आता परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले होते.
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत होईल याचे संकेत दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे.
तसेच दहावीच्या बोर्डाची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधी घेण्यात येईल. तसेच या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. तसेच या परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.