मोठी बातमी ! झेडपीच्या माजी सदस्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव शंकर दराडे (रा.समशेरपूर) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दराडे यांनी नामदेव आनंद डामसे (रा.शेणीत) यांनी मद्यपान करून शिवीगाळ केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे झेडपी सदस्य सुषमा बाजीराव दराडे यांनी देखील आपल्या पाटीवर गुन्हा दाखल करणाऱ्या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

परस्पर विरोधी फिरयदा दाखल केल्यानंतर आता न्याय कोणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, जिल्हा परिषद सदस्या सुषमा बाजीराव दराडे यांना विकास कामांची माहिती विचारण्यासाठी नामदेव आनंदा डामसे (रा.शेणीत, ता. अकोले) व सागर विष्णु तळपाडे (रा. सांगवी. ता. अकोले)

हे दोघे रविवार रोजी गेले होते. तेव्हा बाजीराव दराडे यांना देखील दोघे प्रत्यक्ष भेटले. मार्च २०२० मध्ये शेणीत गावातील पाणी पुरवठा नळ योजनेचे प्रलंबित काम, देवगाव फाटा ते डामसेवाडी रस्त्याची दुरुस्ती, अशा समस्यांचा पाढा दोघे दराडे यांना सांगत होते. हे संभाषण सुरू असताना चर्चेची शुटिंग काढत असल्याचा संशय बाजीराव दराडे यांना आला.

ते दोघांवर अचानक धावून गेले. या दोघांना शिवीगाळ करीत दराडेला जाब विचारण्यासाठी इथवर येण्याची तुमची हिंमत कशी झाली असे म्हणून डामसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दराडे यांनी दोघांना जिवेमारण्याची धमकी देत बळजबरीने दराडे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये शुटिंग करत सुरू केली.

आपण दारू पिऊन आमच्या घरी आला असे कबूल करण्यास डामसे यांना भाग पाडलं. तसेच आमचे मोबाईल हिसकावून त्यातील सर्व डाटा डिलीट करुन दुसऱ्या दिवशी ते मोबाईल सांगवी येथे बाजीराव दराडे यांनी स्वत: आणून दिले. त्यामुळे त्यांनी मला मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली, असे डामसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

यानुसार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव शंकर दराडे (रा.समशेरपूर) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरी तक्रार जिल्हा परिषद सदस्य सुषमा बाजीराव दराडे यांनी दिली आहे. नामदेव आनंद डामसे (रा.शेणीत) यांनी मद्यपान करून शिवीगाळ केली म्हणून दराडे यांनी तक्रार दाखल केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24