Maharashtra news : राज्यात सध्या गाजत असलेल्या शहरांच्या नामांतराच्यासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती माजी खासदार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.
यासोबतच उस्मानाबादचे नामंतर धाराशिव असे करण्याचीही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलेआहे.अलीकडेच औरंगाबादला राज ठाकरे यांची सभा झाली होती. तेव्हापासून नामांतराचा हा जुनाच विषय उफाळून आला होता.
आता ८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही औरंगाबादला सभा आहे. दरम्यान, मुंबईत झालेल्या सभेत ठाकरे यांनी औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगर असे नाव आहेच, आम्ही तेच म्हणतो, असे सांगितले होते.
तरीही नामांतराची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याबद्दल शिवसेनेवर टीका होत होती. त्यामुळे आता ठाकरे यांच्या सभेपूर्वी या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.दरम्यान, अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दाही पुन्हा गाजत आहे. मात्र, एका नावावर एकमत झालेले नाही. अंबिकानगर आणि अहिल्यानगर अशी दोन नावांची मागणी होत आहे.