मोठी बातमी : बाॅलिवडूमधील ‘खुबसूरत गर्ल’ शिवसेनेच्या वाटेवर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-बाॅलिवडूमधील ‘खुबसूरत गर्ल’ म्हणून ओळख असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने उर्मिलाचे नाव राज्यपालांद्वारे नियुक्त आमदारांच्या यादीत घातले आहे. यामुळे उर्मिलाचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील वर्षी उर्मिला मातोंडकर हिने काॅंग्रेस पक्षाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढविली होती.

मात्र, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तिने काॅंग्रेस पक्षातून काढता पाय घेतला होता. सध्या विधानपरिषदेच्या आमदारांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे.

या दरम्यान स्वतः मुख्यमंत्र्यांनी उर्मिलाला फोन करून तिला शिवसेनेत दाखल होण्यासाठी तयार केले होते. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती.

मात्र, भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला यांचा दारूण पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे उर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर उर्मिला या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24