मोठी बातमी ! CBSE 10 वी, 12 वी च्या परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात अनेक मोठे बदल करण्यात आले आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 मे 2021 पासून सुरू होणार आहेत, अशी घोषणा भारताचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली होती. आता, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नेमक्या परीक्षा कधी होणार याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

दहावी आणि बारावी CBSE बोर्डाच्या परीक्षा 4 मे पासून घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. 10 जून 2021 पर्यंत या परीक्षा घेतल्या जातील आणि 15 जुलैपर्यंत या परीक्षांचा निकाल लावला जाईल,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

अद्याप सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं नसलं तरी कालावधी निश्चित केला गेला आहे. यासोबतच, 10 वी आणि 12 वीच्या प्रयोग परीक्षा(प्रॅक्टिकल),

प्रोजेक्ट आणि अंतर्गत गुणवत्ता चाचण्या 01 मार्च पासून ते लेखी परीक्षांच्या तारखेआधी घेण्यासाठी देखील महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरच लेखी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केली जाईल,’ अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24