अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालयात पुन्हा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
मात्र याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
सध्या 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू केले जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन देण्याची सूटही देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
शाळेत किंवा महाविद्यालयात 75 टक्के उपस्थिती अनिर्वाय असणे गरजेचे असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही अट शिथील करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.