अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांची तारीख अखेर आज जाहीर केली आहे.
दरम्यान कोरोनामुळे शैक्षणिक बाबींवर मोठा परिणाम झाला होता. कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद होत्या यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले.
आता नुकतेच शिक्षणमंत्र्यांनी मोठी घोषणा करून पालकांचा व विद्यार्थ्यांचा परीक्षेंबाबतचा प्रश्न सोडला आहे. इयत्ता 12 वी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे.
तर इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 च्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे.
सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते.