Jio ग्राहकांसाठी मोठी बातमी, ग्राहकांना बसेल मोठा झटका !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

वृत्तसंस्था :- एअरटेल, व्होडाफोननंतर आता रिलायन्स जिओने आपल्या दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. ‘रेट्स ऑल इन वन प्लान्स’मध्ये ही दरवाढ होणार असल्याचे जिओने सांगितले आहे.

कंपनीनं रविवारी एक पत्रक जारी केलं. त्या पत्रकात कंपनीनं म्हटलं की, सर्व नेटवर्कवर मोबाइल सर्व्हिस रेट्स ऑल इन वन प्लान्सच्या अंतर्गत वाढवले जातील.

जिओ लवकरच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटासोबतच ऑल इन वन प्लान्स सादर करेल. नवे प्लान्स 6 डिसेंबरपासून लागू होतील.

जिओनं म्हटलं की, टेलिकॉम क्षेत्रात स्थिरता राहावी यासाठी शक्यतो पाऊल उचलण्यात येईल. जिओने ही वाढ अशा वेळी केली आहे की,

जेव्हा प्रतिस्पर्धीं एअरटेल आणि व्होडाफोन 3 डिसेंबरपासून त्यांनी त्यांच्या योजनांमध्ये 40% टक्क्यांनी वाढ जाहीर केली आहे. टेलिकॉम टॅरिफमध्ये बदल करण्यासाठी सरकारकडे सल्ला मागणार आहे, असं जिओनं म्हटलं आहे.

दरम्यान देशामध्ये आता स्वस्त कॉलिंग लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत.रिलायन्स जिओचे प्लान्स ६ डिसेंबर महाग होणार असून एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ३ डिसेंबरनंतर नव्या दरासह आपले प्लान लाँच करणार आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24