अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाच्या न्यायाधीश वंदना कसरेकर यांचे आज कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या.
कासकर बऱ्याच दिवसांपासून किडनी संबंधित आजाराने त्रस्त होत्या. “इंदूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना न्यायमूर्ती वंदना कसरेकर यांनी अखेरचा श्वास घेतला”, असं अमित मालकर यांनी सांगितलं.
“न्यायमूर्ती वंदना कसरेकर यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून त्या किडनी संबंधित आजाराने त्रस्त होत्या”, अशी माहिती अमित मालाकार यांनी दिली.
न्यायमूर्ती कसरेकर यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. “न्यायमूर्ती वंदना कसरेकर यांच्या मृत्यूची दुखद बातमी समजली.
मी इश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. त्यांच्या परिवाराला हे दु:ख पचवण्याची क्षमता मिळो, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत”, असं कसरेकर म्हणाले.
न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कासारेकर उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठातच कार्यरत होत्या. विशेष म्हणजे त्या सध्या इंदूर खंडपीठाच्या एकमेव महिला न्यायाधीश होत्या.