अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- राज्यात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच असून राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.
नुकतंच याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र या आदेशात काही नियमही शिथील करण्यात आले आहेत. यानुसार राज्यातील मॉल्स येत्या 5 ऑगस्टपासून पुन्हा सुरु केले जाणार आहेत.
या गोष्टी बंदच !
काय सुरु होणार ?
दरम्यान गृह विभागाकडून अनुलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली आहे.
सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याशी संबंधित इतर नियमांचं पालन करुन नागरिक स्वतंत्र्य दिवस साजरा करु शकणार आहेत.
कंटेन्मेंट झोन परिसरात 31 ऑगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंटेन्मेंट झोव परिसरात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरु राहतील.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com