अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचे सरकारकडून सांगितले आहे.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीनंतर ही घोषणा केली. तसेच या परीक्षेची पुढील तारीख चर्चा करून घोषित केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना संकट आहे. शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका बंद असल्याने अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून परीक्षा पुढे ढकलली.
दोन वेळा परीक्षा पुढे ढकलली असून आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही. एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved