अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात कमालीची घसरण झाली आहे.
ही घसरण इतकी आहे की लोक जाणून आश्चर्यचकित होतील. काल रिलायन्सचा शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरला होता. यामुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती एका दिवसात सुमारे 48650 कोटींनी कमी झाली.
या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांचे नावही जगातील श्रीमंतांच्या यादीत खाली आले आहे. मुकेश अंबानी आता जगभरातील श्रीमंतांच्या यादीत दहाव्या स्थानावर घसरले आहेत.
653 करोड़ डॉलरने घटली संपत्ती :- ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 5.3 लाख कोटी आहे. एका दिवसात त्यांची संपत्ती सुमारे 653 करोड़ डॉलर किंवा 48650 कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
त्याचबरोबर या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 1250 करोड़ डॉलर म्हणजेच 93000 कोटी रुपयांनी वाढली आहे. मुकेश अंबानी आता ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये 10 व्या स्थानावर आहेत.
सोमवारी रिलायन्सचे शेअर्स घसरले :- सोमवारी रिलायन्सचे शेअर्स जवळपास 8.5 टक्क्यांनी घसरले. यामुळे रिलायन्सचा शेअर्स 1890 रुपयांच्या पातळीवर आला होता. दुसर्या तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्सवर प्रचंड दबाव आहे.
जगातील टॉप 10 श्रीमंत व त्यांची संपत्ती –
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved