अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस पाठवली असून येत्या 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
29 डिसेंबरला त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ‘ईडी’ची नोटीस आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंनाही ‘ईडी’ची नोटीस आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करून ईडी सारख्या यंत्रणा मागे लावत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी केला होता. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरजही राऊत यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, भाजवर आपल्या सामनाच्या अग्रलेखातून किंवा कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका करणाऱ्या राऊतांच्याच पत्नीला नोटीस आल्यामुळे राऊत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.