मोठी बातमी ! राज्यातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे.

आताच हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याबाबतची माहिती वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.

शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची लस येऊन ठेपली आहे.

त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा धोका कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या.

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही अन्य देशांमध्ये कोरोनाची असलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता

मुंबई महापालिकेतील सर्व खासगी आणि सरकारी शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असं मुंबई महापालिकेने जाहीर केलं आहे

अहमदनगर लाईव्ह 24