Maharashtra News:नेवासा तालुक्यातील सोनई येथील तरुण अभियंता रवीराज पवार यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयात मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांची मुख्यमंत्री वॉररूमच्या मुख्य समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मूळचे सोनईचे यांचे प्राथमिक शिक्षण सोनई पब्लिक स्कूल येथे झाले.
व्हीआयटी पुणे येथून त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रुममध्ये नियुक्ती झाली. या काळातील त्यांचे काम लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पवार यांची आता मुख्य समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.
या वॉररूममधून राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांवर देखरेख व सनियंत्रण ठेवण्याचे काम चालते. या कक्षाचा संपर्क थेट मुख्यमंत्र्यांशी असतो. या महत्वाच्या पदावर काम करण्यासाठी संधी ग्रामीण भागातील तरुणाला मिळाली आहे.