अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 92 व्या वर्षी केशुभाई पटेल यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे.
केशुभाई पटेल यांना श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात निकटवर्तीय होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केशुभाई यांनी दोन वेळा गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. पटेल यांनी 1995मध्ये प्रथम गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली.
त्यानंतर त्यांनी 1998 ते 2001 या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांनी राज्यात सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved