अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती.
त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय निवडा,
असा सल्ला दिला होता. परंतु, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊनचाा पर्याय निवडण्यात आला आहे.
कोरोना संसर्ग तोडण्यासाठी अखेर ब्रेक द चेन म्हणत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यादरम्यान, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विनाकारण प्रवास बंद :- सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत.
इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे.
मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
लोकल सेवा पुन्हा एकदा अत्यावश्यक :- मुंबईतील लोकल सेवा पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जाणार आहे.
सरकारी कर्मचारी, डॉक्टर नर्सेस,अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना पास दाखवून रेल्वे नेला प्रवासाला परवानगी दिली आहे.
त्यामुळे सर्व सामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही.
लग्न सोहळ्याला फक्त 25 जण :- लग्न समारंभ सोहळ्यांना फक्त दोन तासांची मर्यादा व फक्त 25 जण लग्न सोहळ्याला उपस्थितीत राहू शकतात.
>>लग्न समारंभासाठी 25 जणांची उपस्थिती असून, दोन तासांत लग्नविधी करावे लागणार, नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड
>>आंतरजिल्हा प्रवासही अत्यावश्यक सेवा आणि महत्त्वाच्या कामांसाठी असेल
>>जिल्हा बंदी लागू करण्यात आली असून, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही
>>मुंबईत खासगी गाडीतून 50 टक्के प्रवासाला परवानगी
>>सरकारी कार्यालये 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील
>>बसमध्ये उभ्यानं प्रवास करता येणार नाही, तसेच खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
>>खासगी आणि सार्वजनिक वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी असेल
>>लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी पूर्णतः बंद असतील, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आयडी कार्ड सक्तीचे