Maharashtra News : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार व एक जण जखमी झाला. येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील बोटा गावातील पुला जवळ सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एमएच १८ बीजी ९९८९) ही भरदाव वेगाने पुणे-नाशिक रस्त्यावरून जात होती.
बोटा गावाच्या परिसरातील पुलाजवळ या बसने समोरून जाणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएस १७ बीजे ६१२६) धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार भरत रंगनाथ पडवळ (वय ४८, रा. कोतुळ पांगरी, ता. अकोले) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
दुचाकीच्या पाठीमागे बसलेला सुनील लक्ष्मण पावडे (वय ४६, रा. खुंटेवाडी, ता. अकोले) हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले.
या अपघात प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात बस चालक सुनील चौधरी (रा. नंदुरबार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.