जगातील सर्वात श्रीमंतांपैकी असणारे बिल गेटस दान करणार आपली ९९ टक्के संपत्ती! मुलांना देणार फक्त १ टक्के, जाणून घ्या संपत्तीची आकडेवारी

बिल गेट्स त्यांच्या 162 अब्ज डॉलर संपत्तीपैकी 99% भाग दान करत असून, फक्त 1% मुलांसाठी ठेवणार आहेत. तरीही त्यांच्या मुलांना अब्जावधींचा वाटा मिळेल. समाजसेवेसाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

Published on -

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी आपली 99 टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेट्स यांनी आपल्या संपत्तीपैकी केवळ 1 टक्के हिस्सा आपल्या तीन मुलांसाठी ठेवण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, 1 टक्के हिस्सा हा इतका प्रचंड आहे की, त्यामुळे त्यांची मुलेही कोट्यधीश बनतील. गेट्स यांचा हा निर्णय त्यांच्या मुलांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी आणि वडिलांच्या संपत्तीच्या सावलीत राहू नये, या विचारातून प्रेरित आहे.

बिल गेट्स यांचे कुटुंब

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी 2021 मध्ये 27 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेतला. त्यांना जेनिफर कॅथरीन (28), रोरी जॉन (27) आणि फोबी एडेल (22) अशी तीन मुले आहेत. गेट्स यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या मुलांनी स्वतःच्या मेहनतीने यश मिळवावे आणि त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर अवलंबून राहू नये.

म्हणूनच त्यांनी आपली जवळपास संपूर्ण संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित 1 टक्के हिस्सा मुलांना मिळेल, जो त्यांच्या भविष्यासाठी पुरेसा आहे, असे गेट्स यांचे मत आहे.

बिल गेट्स यांची संपत्ती किती?

बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती कमावली आहे. अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती सध्या 162 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनात सुमारे 13,900 कोटी रुपयांच्या आसपास आहे. गेट्स यांनी यापूर्वीच आपल्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनद्वारे मानव कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात दान देण्याची घोषणा केली होती.

या फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि गरिबी निर्मूलन यासारख्या क्षेत्रांत जगभरात काम केले जाते. आता 99 टक्के संपत्ती दान करण्याचा त्यांचा निर्णय या सामाजिक कार्याला आणखी गती देईल.

मुलांना मिळणारा हिस्सा

बिल गेट्स यांची संपत्ती इतकी प्रचंड आहे की, त्यातील 1 टक्के हिस्सा देखील कोट्यवधींच्या घरात आहे. याचा अर्थ, जेनिफर, रोरी आणि फोबी यांना प्रत्येकी सुमारे 46 कोटी रुपये (अंदाजे) मिळू शकतात, ज्यामुळे ते कोट्यधीश बनतील.

तरीही, गेट्स यांनी मुलांना स्वतःच्या मेहनतीने यश मिळवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा दृष्टिकोन समाजातील इतर श्रीमंत व्यक्तींसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. गेट्स यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, संपत्तीचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, आणि त्याच दिशेने त्यांचा हा निर्णय आहे.

सामाजिक कार्य

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी स्थापन केलेल्या फाऊंडेशनने गेल्या दोन दशकांपासून जगभरात सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता 99 टक्के संपत्ती दान करण्याच्या निर्णयामुळे या कार्याला आणखी बळ मिळेल. गेट्स यांचा हा निर्णय केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नसून, समाजातील असमानता कमी करण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!