महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय.कामातील एकाग्रता ,सखोल नियोजन , शिस्तबद्ध दैनंदिनी ,शांतपणा ,संघटन कौशल्य, दुरदृष्टी,विरोधकांचे आरोप प्रत्यारोप पचवण्याची वृत्ती या गुणांच्या समूच्च याचे नाव म्हणजेच शरदचंद्र गोविंदराव पवार.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे १२ डिसेंबर १९४० मध्ये जन्म झाला. वडील गोविंदराव हे सहकारी चळवळीत कार्यकर्ते होते तर आई शारदाबाई या स्वातंत्र्यपूर्व काळात स्थानिक राजकारणात कार्य रत होत्या तर थोरले बंधू आपासाहेब हे शेतकरी पक्षात होते. त्यामुळे राजकारणच बाळकडू हे त्यांना घरातूनच मिळालं होत.
कुटुंबाचं संस्काराच संचित कसदार होत त्यामुळे यशाच्या क्षणात जमिनीवरचे पाय सुटू दिले नाहीत आणि संघर्षाच्या परिस्थिती मध्ये धीर खचू दिला नाही. पवारांचं शालेय शिक्षण हे बारामती येथील महाराष्ट्र एजयुकेशन सोसायटी विद्यालयात झाले .पुढे त्यांनी पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य विद्यालयात प्रवेश घेतला आणि यानंतरच कॉलेज च GS. ते केंद्रीय मंत्री हा प्रवास चालू झाला.
युवक काँग्रेस मध्ये प्रवेश करून वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस चे अध्यक्ष झाले.यशवंतराव चव्हाण हे राजकीय गुरू झाले. पुढे त्यांनी १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाले. शरद पवार हे राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व.
आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या डावपेचांचा थांगपत्ता लागू न देणं ही हातोटी राजकारणात असावी लागते आणि तिचा वापर ते आत्तापर्यंत खुबीने करत आलेत. त्यांच्या खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली ती वसंतदादा मुख्यमंत्री असतानाच कारण त्यावेळी पवारांनी राष्ट्रवादीचे १२ आमदार फोडून विरोधी पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि वसंतदादा चे सरकार पाडले.
राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून १८ जुलै १९७८ रोजी शरद पवार यांचा शपथ विधी झाला. २६ जून १९८८ रोजी दुसऱ्यांदा तर ४ मार्च १९९० ला तिसऱ्यांदा शपथ घेतली.पुढे नरसिंह रावांनी पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले.६ जून १९९३ ला त्यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
काँग्रेस पार्टीमध्ये बंडखोरी केल्यामुळे पवारांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला आणि त्यानंतर त्यांनी १० जून १९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात आघाडी सरकार मध्ये सामील झाला आणि २२ मे २००४ मध्ये पवार साहेब देशाचे कृषीमंत्री झाले.
पवार साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात महत्वाची कामे केली. माजी सैनिक निवृत्ती वेतन वाढ,फळबाग विकास योजना,पोलिसांची हल्फ पँट जाऊन फुल पँट चा निर्णय,महाराष्ट्राचा सहकार क्षेत्रातील विकास,
साखर कारखाने क्षेत्रातील योगदान,मुंबईतील दंगली,किल्लारी भूकंप या संकांटणातर हाताळलेले परिस्थिती ,महिला आरक्षण विषयातील भूमिका आणि निर्णय ,महिला बचत गटांना बळ देण्याचं धोरण,राज्यातील वंचित घटकांसाठी धोरण.
राजकारणा शिवाय पवारसाहेबानच क्रिकेट हे आवडीचे क्षेत्र.१९ नोव्हेंबरला २००५ ला ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले.तर १ जुलै २०१० ला ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले.निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांना भेटायला त्यांना आवडत.राजकारणात आहोत म्हणून काय चोवीस तास राजकारणाचा च विचार करायचा?
मला ते घातक वाटत अस पवार साहेब म्हणतात म्हणून त्यांच्या मते पक्ष ,निवडणूक, सरकार निव्वळ या भोवतीच फिरत नाही तर त्यातल एकारलेपण घालवायचं असेल तर शिक्षण,उद्योग,साहित्य,कला,क्रीडा,संस्कृती ,संशोधनं अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शी कायम संवाद ठेवायला हवा.
त्यामुळे राजकारणात अधिक मोल प्राप्त होतच पण त्याचबरोबर राजकारणाची खोली ही वाढते. दिवसभरातील भेटीगाठी,दौरे ,प्रवास,बैठका, जाहीर सभा यातूनही स्वताहासाठी वेळ काढण्याचा वळण त्यांनी लावून घेतलंय. कितीही धकाधकीचं दिवस असेल रात्री झोपण्यापूर्वी शास्त्रीय संगीत ते ऐकतातच.
पुस्तक वाचन किंवा आवडत्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका ऐकण्याची त्यांना सवय आहे. निवांत क्षण घालवण्यासाठी मित्रांसोबत पर्यटन ला जाणे,पत्नी प्रतिभा यांच्यासमवेत फिरायला जाणे तिथे गेल्यावर स्थानिक लोकांशी गप्पा मारणे हा त्यांचा आवडीचा विषय.
२०१९ विधानसभा निवडणुकीत तर साडेपाच दशक केलेली तपश्चर्या च पाहायला मिळाली. ८० वर्षाचं आजाराने ग्रासलेले शरीर प्राणपणाने लढत होत. उन्हा पाऊसाची तमा न बाळगता रात्रंदिवस ते प्रचार आणि दौरे करत होते. अखाद्या तरुणाला ही लाजवेल असे ते लढले.कितीही पैसा असो ,राजकीय पक्षाचं खरं भांडवल म्हणजे त्यांचा जनाधार निव्वळ संपत्तीच्या जीवावर राजकीय पक्षाचं अस्तित्व टिकू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिलं.