भाजप सरकार हुकुमशाही राजवटीप्रमाणे वागत आहे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- शेतकरीविरोधी असलेल्या नव्या कृषी विधेयकाविरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास किसान सभेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर सदर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या केंद्रातील भाजपप्रणित मोदी सरकारचा जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली. 

प्रारंभी महिला शेतकरी चित्रा उगले व रोहिणी घिगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपप्रणित मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात कॉ. सुभाष लांडे, बन्सी सातपुते, भैरवनाथ वाकळे, आप्पासाहेब वाबळे, संतोष खोडदे, विजय केदारे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर, सुनिल ठाकरे, विकास गेरंगे, अरुण थिटे, भारत अरगडे आदिंसह शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

टाळेबंदी काळात शेतकरी विरोधात केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हुकुमशाही राजवटीप्रमाणे भाजप सरकार वागत आहे. या काद्याला विरोध दर्शविणार्‍या शेतकर्‍यांवर लाठी हल्ला, अश्रूधुर व पाण्याचे फवारे मारुन अनेक शेतकर्‍यांना जखमी करण्यात आले.

तर एक शेतकरी या चळवळीत शहिद झाला. केंद्र सरकारची ही दडपशाही संतापजनक असून, सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप कॉ. सुभाष लांडे व बन्सी सातपुते यांनी केला. यावेळी आंदोलकांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत शेतकरी विरोधी कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24