अहमदनगर :- नगर शहर व उपनगरांमध्ये भाजपचे ८५ हजार ऑनलाईन सदस्य नोंदणी झाली आहे.पक्षाचे प्राथमिक सदस्य संख्या ३ हजार झाली आहे, तर सक्रीय सदस्यांची संख्या ९०० झाली आहे, अशी माहिती भाजपचे माजी गटनेते सुवेंद्र गांधी यांनी गुरुवारी दिली.
भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. नगर शहरातील केडगाव, भिंगार, मध्यनगर, सावेडी या उपनगरांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे.
या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत नगर शहरासह उपनगरांमध्ये भाजपचे ८५ हजार ऑनलाईन सदस्य नोंदणी झाली आहे.नगर शहरात ७१ शक्तीकेंद्र प्रमुख असून, २८९ बुथ आहेत. एक बुथ प्रमुख व ३० कार्यकर्ते अशी बुथ रचना करण्यात आली आहे.
सदस्य नोंदणीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.शहर सरचिटणीस किशोर बोरा यांच्या नेतृत्वाखाली शहरात सदस्य नोंदणी सुरु आहे.
सदस्य नोंदणीसाठी प्रत्येक प्रभागात पदाधिकारी ही सदस्य नोंदणी करत आहे. दिलेल्या उिद्दष्टांपैकी जास्त सदस्य नोंदणी नगर शहरात भाजपची होईल, असे गांधी यांनी सांगितले.