मुंबई :- महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तास्थापना केली आहे.महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणाऱ्या घडामोडी एका रात्रीत घडल्या
आज सकाळी अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली.
राज्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या चर्चेच्या गुऱ्हाळात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मोठा धक्का देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात जबरदस्त राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ केली.
सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानले.
महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला.