अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी विधानपरिषदेबाबत माझ्या नावाची शिफारस केली होती. 81 शिफारशी झाल्या होत्या. त्यामुळे श्रेष्ठींनी निर्णय घ्यायला हवा होता.
आजी-माजी आमदारांनीही शिफारशी केल्या होत्या. तरीही श्रेष्ठींना विचार केला नाही, अशा शब्दांत भाजपचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी श्रेष्ठींबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे जाणाऱ्या शिंदे यांची नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे. एव्हढ्या मोठ्या घराण्याशी लढत असतानाही मागील वेळेपेक्षा मला दहा हजार मते जास्त मिळाली. याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करायला हवा होता, असेही ते माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.
मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी शिफारशी केल्या होत्या. 81 शिफारशी होत्या, तरीही असे का झाले, हे सांगता येणार नाही. एवढ्या मोठ्या घराण्याशी लढा दिल्याचा विचार हवा होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®