अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- पैसे दाम दुपट्ट करून देण्याचे अमिष दाखवून गुंतवणुकदारांना तब्बल १ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या कल्याण शहर भाजपच्या महिला मंडळ अध्यक्षा आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याण पश्चिम परिसरात झोजवाला कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी एटीएम मल्टीट्रेड सर्व्हिसेस नावाचे कार्यलय थाटले होते. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रेखा रामदास जाधव ही भाजपची महिला मंडळ अध्यक्ष असून तिच्यासह एका आरोपीला अटक झाली आहे.
गंगाधर राव (रा. जोशीबाग, कल्याण) सुनील आव्हाड, आणि संदीप सानप अशी इतर आरोपींचे नावे असून ते फरार आलेत. श्रीकांत गंगाधर राव हा यातील मुख्य आरोपी आहे. रेखा रामदास जाधव ही भाजपची महिला मंडळ अध्यक्षा असल्याने तिच्या ओखळीच्या अनेकांनी तिच्यावर विश्वास ठेवून लाखो रुपये या कंपनीत गुंतवले.
चार वर्ष होत आली तरी देखील ठेवीदारांना आरोपीने मोबदला परत दिला नाही. त्यामुळे ठेवीदारांनी मोबदल्यासाठी तगादा लावला असता कंपनीचे नुकसान झाले आहे असे सांगुन मुख्य आरोपी राव याने पैसे परत करण्यासाठी बँक लोन करावे लागले अशी थाप मारली.
त्यांनतर गुन्ह्यातील दोन आरोपींनी तक्रादार महिलेच्या घराचे कागदपत्रे दाखवून चंदा पाटील या महिलेकडून २० लाख रुपये कर्ज उचलले. मात्र, ते पैसे ठेवीदारांना न देता आरोपींनी ठेवून घेतले.
त्यांनतर पुन्हा काही ठेवीदारांना बँक लोन करुन देतो असे म्हणुन इतरही ठेवीदारांकडून बँक लोनसाठी दागिने घेऊन अशी एकुण १ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी भामट्या चौकडीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पत्रे करीत आहेत.