अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे.लॉकडाऊन बाबत डॉक्टर या नात्याने भूमिका मांडली. पण मलाही मर्यादा आहेत. प्रशासन माझे ऐकत नाही. मी एकटा पडलोय,’ असे हताश वक्तव्य भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पाच दिवसांचा कर्फ्यू लावावा, अशी मागणी सुजय विखे यांनी केली होती मात्र पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगरमध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचे सांगत विखे यांची मागणी फेटाळली.
लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून विखे यांनी पुन्हा भूमिका मांडली. नगरच्या जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असली तरी प्रशासन ते मान्य करण्यास तयार नाही. प्रशासन माझे ऐकत नसल्यामुळे मला जनतेसमोर खुले आवाहन करावे लागत आहे.
सध्या माध्यमे जागृत असल्यामुळे कोरोना बाधितांचे आकडे बाहेर येत आहेत. नगरमध्ये तर एका रुग्णाला टॅम्पोतून टाकून नेल्याचा प्रकार बाहेर आला आहे. उद्या अशा गोष्टी तुमच्या ओळखीत होतील तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव होईल.
परिस्थिती हाताबाहेर असतानाही प्रशासन बैठकीत कोणते आकडे सांगतात व कोणते नाही, ही त्यांचीच जबाबदाही आहे. सध्या मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझ्याकडे म्हणणे मांडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक डॉक्टर या नात्याने काय केले पाहिजे, याची सूचना मी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना केली. लॉकडाऊन बाबत विनंती करण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नाही. कारण मी स्वतः जाऊन प्रत्येक घर बंद करू शकत नाही,’ असेही विखेंनी स्पष्ट केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com