नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने नेत्यांची महाभारती केली होती. पण सत्ता बदलानंतर हेच नेते घरवापसी करताना दिसत आहेत. 

राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री गणेश नाईक घरवापसी करणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार येईल, या आशेने विधानसभा निवडणुकांच्या महिनाभर आधी गणेश नाईक यांनी पुत्र संदीप नाईक यांच्यासह भाजप मध्ये प्रवेश केला होता.

महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती पण झालं उलटच  महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि अपेक्षा भंग पावली.

नाईकांच्या दृष्टीने पालिका निवडणूक महत्त्वाची असल्याने त्यांनी हालचाली सुरु केल्याचं बोललं जातं. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबईतही यशस्वी झाला, तर महापालिकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता धूसर होईल.

त्यामुळे महाविकास आघाडीचा घटकपक्ष होऊन पालिका निवडणूक लढवण्याची मागणी नाईक सर्मथकांनी उचलून धरली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24