अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी राज्यात भाजपच्यावतीने आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
नगरमध्ये भाजपाच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयासमोर निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, सरचिटणीस विवेक नाईक, तुषार पोटे, उपाध्यक्ष महेश नामदे,
अमोल निस्ताने, किरण जाधव, सुजित खरमाळे, आकाश सोनवणे, यश शर्मा, मयुर राज पुरोहित योगेश मुथा आदि उपस्थित होते. याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले,
सरकार विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्वण गोस्वामींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, महाविकास आघाडी सरकारने सुडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा जाहीर निषेध आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकारितेवर हा मोठा आघात आहे. लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाने गळा काढणारे सर्व या लोकशाहीच्या हत्याविरुद्ध, गळचेपीबद्दल मौन बाळगून आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved