शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या मागणीसाठी धावली भाजपा; आंदोलनाचा घेतला पवित्रा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात पार्टीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या काळात मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धावले आहे. नगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत व

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा या मागणीसाठी नगर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहमदनगर तहसील कार्यालय येथे निदर्शन करून नायब तहसीलदार अभिजीत बारवकर व प्रवीना तडवी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असताना यंदा सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे

तालुक्यात अनेक ठिकाणीमोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे ऊस, मुग, उडीद, सोयाबीन, मका इत्यादी सारखी अनेक पिके नष्ट झाली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे.

अशा परिस्थितीत प्रशासनाने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे त्यामुळेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत अशी मागणी भाजपा नगर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24