अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरु असून याकाळात अनेकांनी माणुसकी जपत मदतीचा हात पुढे केला.

अनेकांना या संकटातून बाहेर येण्यासाठी अनेक दातृत्वाचे हात पुढे सरसावले. अशातच समाजातील एक महत्वाचा घटक असणारे तृतीय पंथांसाठी भाजपा धावली आहे.

कोरोनाच्या महामारीच्या काळात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. कोरोनाच्या महामारीत माणुसकीचा धर्म महत्त्वाचा आहे,”

असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले. भाजपतर्फे अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक, रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधाचे वाटप सुरू आहे.

तृतीयपंथीयांच्या प्रमुख काजल गुरू यांच्याकडे ही औषधे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सुपूर्द केली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांनी यापूर्वी

कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील सर्वांनाच अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले. ज्या लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचत नाहीत, त्यांना या गोळ्यांची नितांत गरज आहे. ते काम महेंद्र गंधे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24