नेवासे :- माजी खासदार दिलीप गांधी यांनी नेवाशातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह अर्बन बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळाव्यात कार्याकर्त्यानी धरला.
भाजपने दिलीप गांधी यांना उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणण्याचा निर्धार भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी यावेळी व्यक्त केला.
मंगळवारी अर्बन बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी भाजपचे व खासदार गांधी यांना मानणारे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्बन बँकचे उपाध्यक्ष नवनीत सुरपुरीया यांनी प्रास्ताविकात बँकेच्या वतीने आरोग्य जीवनदायी योजनेची माहिती देतानाच प्रारंभी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार गांधी यांचा नेवाशात चांगला जनसंपर्क आहे.
भाजपचे ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यामुळे येणार्या विधानसभेला त्यांनी तालुक्यातून भाजपची उमेदवारी करावी,
त्यासाठी आम्ही प्रयत्न करायला मागे पुढे पाहणार नसल्याचे सांगून मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला.
गाधी यांनी देखील या मागणीला मार्मीक कलाटणी देत नेवाशातून लढा म्हणणे सोपे आहे. परंतु ऐनवेळी पक्ष घेईल तो निर्णय व देईल तो आदेश पाळणार आहे.
तुम्ही सगळ्यांनी एवढे प्रेम व्यक्त केले तेच माझ्यासाठी खूप मोठे असल्याचे सांगितले.
या माध्यमातून गांधी यांनी नेवाशात संपर्क अभियान राबवण्यास सुरूवात केल्याची चर्चा मात्र तालुक्यात जोर धरू लागली आहे.