सभागृह नेतेपदी भाजपचे मनोज दुल्लम यांची वर्णी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- महापालिकेत सभागृह नेतेपदी भाजपचे मनोज दुल्लम यांची वर्णी लागली आहे.महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तसे पत्रही दुल्लम यांना दिल्याचे समजते.

स्वप्नील शिंदे यांची 4 मार्च 2019 रोजी त्यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता भाजपने दुल्लम याना संधी दिली आहे.

भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे सभागृह नेते पदासाठी मनोज दुल्लम यांचे नाव सुचविले आहे. मावळते सभागृह नेते शिंदेही बैठकीला उपस्थित होते.

त्यानुसार दुल्लम यांना सभागृह नेते पदाची जबाबदारी देण्यात येत असल्याचे पत्र दिले आहे असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

कोरोना संकट काळात या पदावर काम करण्याची अतिरिक्त संधी शिंदे यांना मिळाली. आता राजकीय गाडा पूर्वपदावर आल्याने सभागृह नेता पदाची खांदेपालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार सावेडीतील भाजप नगरसेवक मनोज दुल्लम यांना या पदावर संधी देण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तसे पत्रही दुल्लम यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24