Maharashtra Politics : भाजपची आमदारकीची तयारी सुरु ! पवारांची व्यूहरचना, मुस्लिम मराठा फॅक्टर व पक्षफुटीची नाराजगी सुपडासाफ करेल?

Ahmednagarlive24 office
Published:
fadnvis

Maharashtra Politics : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचे निवडणूकपर्व अद्याप सुरु आहे. शेवटचा टप्पा झाला की ४ जून ला निकाल लागेल. म्हणजे अजूनही लोकसभेचेच रहड़गाडगे सुरु आहे. इतर पक्ष अद्याप आकडेमोडीतच व्यस्त असताना परंतु आतापासूनच भाजपने विधानसभेची तयारी केली आहे.

राज्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला तर लोकसभेच्या प्रचारात जातीपातीचे, धर्मपंथाचे, पक्ष फोडाफोडीचे मुद्दे उपस्थित झाले. आता विधानसभेला हे मुद्दे पुन्हा समोर येतील परंतु यावेळी मुस्लिम मराठा फॅक्टर व पक्षफुटीची नाराजगी हे मुद्दे जास्त इफेक्टिव्ह ठरतील. सोबतच शरद पवार यांची व्यूहनीती, उद्धव ठाकरेंप्रती असणारी सहानुभूती आदी मुद्दे देखील भाजपला जड जातील असे चित्र आहे.

मुस्लिम मराठा फॅक्टर
विधानसभेला मुस्लिम मराठा फॅक्टर व सोबत दलित मतांची बांधणी ही भाजपसाठी मोठे आवाहन ठरू शकते असे म्हटले जाते. लोकसभेला जरी याची दाहकता कमी असली तरी विधानसभेला मोठे आवाहन निर्माण होऊ शकते असे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना सांभाळत गेले तरी हा समाज अस्वस्थ असल्याचे सध्या तरी दिसते. नोकऱ्या नाहीत, शेती नुकसानीची, त्यामुळे आरक्षण हवं असा विचार सध्या समाजाचा असल्याने मराठा समाज अस्वस्थ आहे अशी चर्चा आहे.

तर त्यांना आपल्यातून सवलती दिल्या जातील या भीतीने ओबीसी वर्ग अस्वस्थ असल्याचे दिसते. मुस्लिम बांधवांची मते भाजपला पडत असली तरी बहुतांशी मतदान आपल्याकडे वळवण्यात तरी भाजपला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे मुस्लिम मराठा फॅक्टर नेमका काय निर्णय घेतो त्यावरही भाजपचे जय पराजयाचे गणित अवलंबून असेल असे म्हटले जाते.

भाजपकडून मोर्चेबांधणी, फडणवीसांसारखे चाणक्य..
सर्वच गोष्टींचा विचार करता भाजप आतापासूनच मोर्चे बांधणीला लागली आहे. कितीही संकटे असली तरी भाजपचे प्लॅनिंग हे सडेतोड असते व ते त्यावर मात करतात. परिस्थिती कितीही बिकट वाटत असली तरी भाजप मुसंडी मारू शकतो हे भाजपने छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे.

शिवसेना (ठाकरे गट) यास असणारी सहानुभूती, काँग्रेसच्या वाढत्या जागा वाढतील, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची व्यूहरचना आदी शक्यता गृहित धरून पक्ष कामाला लागलेला दिसतोय.

भाजपकडे मंत्री गिरीश महाजन, चाणक्य समजले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींची फौज असल्याने ते देखील पूर्ण क्षमतेने उतरतील व विजयी वाटचाल करण्याइतपत मैदान तयार करतील यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe