अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुंबईत वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे,अवघ्या सतरा वर्षांच्या मुलीवर तिच्या प्रियकरासोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ दाखवून नराधम बापाने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
पीडित मुलीच्या फोनमध्ये तिचे अनेक नग्न व्हिडिओ होते. ते तिच्या आईने पाहिले. नोव्हेंबरमध्ये हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या फोनमधून तिच्या बापानंही सर्व व्हिडिओ स्वतःच्या फोनमध्ये घेतले होते. ही बाब देखील तिच्या आईला समजली. अखेर मुलीनं तिच्या आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिनं पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवली.
मुलीचे कॉलेजमधील मुलासोबत प्रेमसंबंध होते. १५ जुलै २०१९ रोजी तो मुलगा घरी आला होता. कॉलेजमधील एका प्रोजेक्टसाठी त्याला मदत हवी होती. त्यावेळी आई-वडील घरी असल्याचं मुलीनं त्याला सांगितलं. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मुलानं सगळ्यांसाठी काही पदार्थ मागवले. मुलीला बरं वाटत नव्हतं. मी नंतर खाते असं तिनं सांगितलं.
जेव्हा ती ते पदार्थ खायला आली तेव्हा सगळं संपलं होतं. मुलगी रागावली आणि तिच्या खोलीत निघून गेली. तो मुलगा तिला समजावण्यासाठी खोलीत गेला. तिचा राग शांत झाल्यानंतर मुलानं तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तिनं विरोध केला असता, त्यानं बळजबरी केली. या घडलेल्या प्रकाराबाबत मुलीनं कुणाकडेच वाच्यता केली नाही.
दुसऱ्या दिवशी मुलीची आई घरी नव्हती. त्यावेळी बापानं मुलीचे त्या मुलासोबतचे सेक्स करतानाचे व्हिडिओ पाहिले. त्यानंतर त्यानं मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिच्यावर बलात्कारही केला. ते सर्व व्हिडिओ आईला दाखवण्याची धमकी तो देत होता. तसंच कुणाला सांगितलं तर, ते व्हिडिओ व्हायरल करीन तसंच तुझ्या आईला घटस्फोट देईल, असं तो तिला धमकावत होता.अखेर या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.