अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ शिर्डी : आमदार नितेश राणे यांनी आपल्या मातोश्रीसमवेत शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
साईबाबा संस्थानच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, तर शिर्डी नगरपंचायतच्या वतीने उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, बांधकाम समिती सभापती छायाताई पोपटराव शिंदे,
नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, हाजी बिलाल शेख, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव शिंदे, नितीन कोते तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष किरण बोराडे, स्वानंद रासने यांनी सत्कार केला.
यावेळी प्रसाद शेलार, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते. आमच्या राणे कुटुंबाची साईबाबांवर अपार श्रद्धा असून, आमच्या पाठीशी बाबांचे आशीर्वाद आहे.
आपण आपल्या खासगी कामानिमित्त शिर्डीत आलो असून, साईबाबांचे दर्शन माझ्या परिवारासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.