#Blog : ना. राम शिंदेचे राजकीय पालकत्व विखेंकडे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- जिल्ह्याची भाजप आता विखे पाटील म्हणतील त्या दिशेला जाताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडे तिकीटाची मागणी करणारे डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक होऊन सहा महिन्यातच अहमदनगर भाजप स्वताच्या ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात अतिशय वाईट वेळेत त्या वेळी भाजप वाढवली, मोठी केली आणि त्याचे फळ म्हणून २०१४ ला जिल्ह्यात ५ जागा भाजपला मिळवून देणारे ना. राम शिंदे यांचे पालकत्व आता चक्क नुकतेच पक्षात आलेले विखेना घ्यावे लागल्याने जुन्या व एकनिष्ठ कार्यकर्त्यामधून काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या विरोधात विखे के शिंदेचे’ काम’ करणार यात तिळमात्र संशय नसल्याने संपूर्ण राज्याचे या निकालाकडे लक्ष लागलेले आहे. नगर जिल्ह्यात भाजप वाढीसाठी ना. राम शिंदे यांचे मोठे योगदान आहे.

त्यांनी जेष्ठ संघसेवक शाम जाजू, माजी आ. चंद्रशेखर कदम, वहाडणे यांना सोबत घेऊन पक्ष वाढवला. पक्षाची मजबूत बांधणी केली. जिल्ह्यात विखे, थोरात असे दिग्गज विरोधक असताना त्यांनी मोठा संघर्ष केला. स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकात अनेक पराभव पाहूनही त्यांनी पक्ष्याची साथ सोडली नाही. अखेर त्यांना यश आलेच.

२०१४ मधील निवडणुकीत ५ जागा मिळाल्या, त्यापूर्वी लोकसभेतही पक्षाला मोठे यश मिळाले, तेव्हा पासून भाजपला अच्छे दिन आल्याने पक्षाने कधी मागे वळून पहिलेच नाही. दरम्यान आता पक्षाला चांगले दिवस येताच इनकमिंग जोरात सुरु झाले आहे. त्यात विरोधी पक्षाचे नेते ना राधाकृष्ण विखे पाटील आपला मुलगा खासदार डॉ सुजय विखे यांच्या पाठीमागे भाजपात आले.

भाजप कार्यकर्ते मनोमन दुखावले असले तरी, ते दुःख व्यक्त करून कोणताही उपयोग नसल्याचे त्यांच्याही लक्षात आले, त्यामुळे यापूर्वी जय श्रीरामचा घुमणारा नारा आता दादा. साहेबांच्या नावाने घुमू लागला. यात भाजप हरवून गेला तर विखे कार्यकत्यांनीच भाजप ताब्यात घेतलयाचे वेळोवेळी दिसून आली. 

आता मूळ कार्यकर्ते फकत प्रचारापुरतीच राहणार आहेत, तर महत्वाची पदे, महामंडळे ही विखेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाटली जाणार आहेत, एवढेच नाही तर महत्वाची खाती देखील विखे ठरवतील त्यालाच मिळतील हे देखील नाकारता येणार नाहीत.

आताच्या विधानसभेला उमेदवारी अर्ज भरताना ना. विखे व खा. डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात जाऊन हजेरी लावली. यामुळे एक प्रकारे संपुर्ण जिल्हा आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे. 

आज भाजपात आयराम जास्त झाले आहेत, त्यामुळे निस्थावंत दुखावले आहेत. त्यात उमेदवारी देताना ही कोपरगाव वहाडणे असतील किंवा राहुरीचे कदम या संघाच्या लोकांना डावलण्यात आलेले आहे,  नव्हे तर उमेदवारी देताना संघाच्या लोकांना साधं विचारत घेतले नाही त्यामुळे भाजप जिंकला मात्र संघ हरला अशीच भावना संघाचे सेवक व्यक्त करत आहेत.

त्यामुळे भाजपातील निष्ठावंत कार्यकत्यांच्या चेहऱ्यावर वरवर हसू दिसत असले तरी अंत करणात मात्र प्रचंड दुःख व्यक्त होताना ऐकायला मिळत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24