अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-सई ताम्हणकर एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत ओळखली जाते. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.
ती तिच्या स्टायलिश आणि बोल्ड फोटोंमुळे सतत चर्चेत असते. सईने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिने या फोटोशूटमधून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती सिल्वर कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये साई खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
तिने वेगवेगळे पोज देत फोटो काढले आहेत. सई ताम्हनकरचे फोटो पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सई सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमध्ये जजची भूमिका करत आहे.
ती लवकरच ललित प्रभाकरसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. त्या चित्रपटाचे नाव कलरफुल आहे. हि एक लव्हस्टोरी असून त्यात सई मीराच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे त्याच्या या नवीन जोडीविषयी सांगताना बोलत होते, सई आणि ललिताचे काम मी जवळून पहिले आहे. सई आणि ललित दोहेही गुणी कलाकार आहेत.
या सगळ्यात ‘कारण आणि मीरा’ हे पात्र हि दोघेच साकारू शक्तीला याबाबत मी ठाम होतो. सई आणि ललित यांची पात्र जरी वेगळी असली तरी प्रेक्षक ती स्वीकारतील हा माझा विश्वास आहे.