बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांड्ये हिला ‘या’ कारणामुळे अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-बॉलिवूड अभिनेत्री , मॉडेल पूनम पांड्ये हिला आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी बोल्ड फोटोशूट केल्या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टीच्या वुमेन विंगकडून पूनम विरोधात तक्रार देण्यात आली होती.दक्षिण गोव्याचे एसपी पंकज कुमार सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. जल संपदा विभागातील सहाय्यक अभियंता यांनी देखील तक्रार केली होती.

आयपीसीच्या कलम २९४ अन्वये पूनमवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. तसंच पूनमसोबत तिचा हा व्हिडिओ शूट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24