महाराष्ट्र

कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर, शिर्डीचे काय होणार?

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news:कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हे दोघेही लवकरच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते.

आता शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.राज्यातील बहुसंख्य खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने आपण तरी कशाला सेनेत राहायचे या मानसिकतेत आहेत.

मंडलिक यांनी आज यासाठी मेळावा आयोजित केला असून त्याच निर्णय किंवा घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. असे झाल्यास शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात मोठा दणका बसू शकतो.

इकडे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे अद्याप शिवसेनेसोबत असल्याचे सांगण्यात येत असले तरी पुढील काळात काय होणार? याबद्दल सांगणे कठीण आहे. शिवसेनेने भाजपसोबत जावे, राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना मतदान करावे,

अशी उघड मागणी त्यांनी केली होती. शिवाय त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील पुढील निवडणुकीचे गणितही त्यांना विचारात घ्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याही भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office