अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जागृत देवस्थान श्री घोडेश्वरी देवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली असून.
मंदिर गाभाऱ्यातील १७ किलो चांदी व त्यावरील हिरे असे एकूण ११ लाख रुपयांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
सोनई पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय थोरात यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली.
मंदिर गाभाऱ्यात ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.तसेच श्वान पथक देखील दाखल झाले होते. घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी माता मंदिरात धाडसी चोरी झाल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
करोडो रुपयांच्या लोकवर्गणीतून देवी मंदिराचे भव्य काम उभे केले आहे.मागील वर्षीच मंदिराचे काम पूर्ण झाले होते. एवढ्या मोठ्या प्रसिद्ध मंदिरात असलेले cctv कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद आहेत ,
cctv कॅमेरे जर सुरू असते तर लाखो रुपयांची चोरी होण्यापासून रोखता आली असती. ट्रस्टीच्या हलगर्जीपणामुळे आज ही चोरी झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved