ब्रेकिंग : अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन,रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- हिंदूत्ववादी कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे आज निधन झाले आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

अपर्णा रामतीर्थकर या चांगल्या वक्त्या होत्या आणि त्यांची मते त्या परखडपणे मांडत होत्या. पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या.

सोलापुरातील पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. संस्कारभारतीच्या माध्यमातून त्यांनी सोलापुरात काम केले होते.

बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.

कुटुंब, संस्कार याबाबत त्यांनी राज्यात आणि देशात ठिकठिकाणी जाऊन त्यांची मते मांडली होती. अनेक जोडपी विभक्त होण्यापासून त्यांनी वाचवले होते. समुपदेशनातून त्यांनी दुभंगलेली मने जोडण्याचा प्रयत्न केला होता. आ

आई-वडिलांनी मुलांवर संस्कार घडवावेत. संस्कार घडविण्यात आणि संस्कृती रक्षणात आईची भूमिका महत्वाची असते, असे मत अपर्णा रामतीर्थकर या सातत्याने मांडत होत्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24