ब्रेकिंग ! मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सापडले कोरोनाच्या विळख्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.

त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान प्रत्येकाने मास्क घालण्याचं आणि स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दरदिवशी राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. यातच राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

आरोग्यमंत्री, गृहमंत्री, अन्न पुरवठा मंत्री यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री कोरोनाच्या जाळ्यात सापडले होते. मात्र योग्य ती काळजी घेत व उपचार घेत ते कोरोनामुक्त झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24