BREAKING : ‘त्या’ कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  बीड जिल्ह्यात आढळलेल्या मात्र मुळच्या अहमदनगर जिल्ह्याच्या असलेल्या 7 कोरोनाग्रस्तापैकी एका 65 वर्षीय महिलेचा बळी गेला आहे. कोरोनामुळे बळी गेलेला बीड जिल्ह्यातील हा पहिला रुग्ण आहे.

जिल्हा रुग्णालयातील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा आज (दि. 18) पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. हे सात जणांचं कुटुंब मुंबईहून बीड जिल्ह्यात दाखल झाले होते.

पाटण सांगवी हे या कुटुंबातील सुनेचं माहेर घर होते. हे कुटुंब मुळचे पिंपळगाव कौडा (ता:नगर,अहमदनगर) येथील रहीवासी  होते.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 9 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी हा पहिला मृत्यू झालेला आहे. उर्वरित आठ जणांवर उपचार सुरु आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24