ब्रेकिंग : मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून भावाची हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मुलीला पळविल्याच्या रागातून मुलीच्या बापासह चुलत्याने प्रियकराचे आई-वडील व अल्पवयीन भावावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात अल्पवयीन भावाचा मृत्यू झाला असून, आई-वडील गंभीर जखमी आहेत. ही घटना लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे शनिवारी रात्री घडली.

रोहिदास छगन देवकर व देवीदास छगन देवकर, रा.लाख खंडाळा असे दोन्ही आरोपींची नावे आहेत. भीमराज बाळासाहेब गायकवाड (17), रा.लाख खंडाळा असे हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखखंडाळा येथे बाळासाहेब गायकवाड हे पत्नी व दोन्ही मुलांसह शेतवस्तीवर राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा अमोल गायकवाड हा कामासाठी चाललो म्हणून घरातून बाहेर पडला.

मात्र तो घरी परत न आल्याने त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला. तो मिळून न आल्याने त्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसात कळविली. शेजारीच शेतवस्तीवरील मुलगी घरातून बेपत्ता असल्याची माहिती गायकवाड कुटुंबियांना होती.

शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बाळासाहेब गायकवाड व त्यांची पत्नी अलका हे दोघे घरासमोर बसलेले होते तर लहान मुलगा भीमराज हा घरात झोपलेला होता. यावेळी त्याठिकाणी रोहिदास देवकर व देवीदास देवकर हे दोघे त्याठिकाणी आले.

यावेळी तुम्ही इकडे कसे काय आलात ? अशी विचारणा बाळासाहेब यांनी त्यांना केली. मात्र काही समजण्याचे अगोदरच देवकर बंधूंनी बाळासाहेब यांच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केला. यावेळी अलका यांनी पतीला वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांच्यावरही दोघांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. याअवस्थेत जीव वाचविण्यासाठी बाळासाहेब हे पत्नीसह त्यांचे मोठे भाऊ दादासाहेब गायकवाड यांच्या घराकडे पळाले. त्यांचा भाऊ व पुतण्यांनी त्यांना उपचारसाठी वैजापूर येथे रुग्णालयात आणले.

याप्रकरणी अलका बाळासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवीदास छगन देवकर व रोहिदास छगन देवकर या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खुनासह अस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24