ब्रेकिंग बातमी! राज्यात होणार पोलीस भरती; गृहमंत्र्यांनी केली घोषणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-पोलीस भरतीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे.त्यांच्या सांगण्यानुसार १२,५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

त्यांच्या सांगण्यानुसार पहिल्या टप्यात ५,३०० जागा भरल्या जाणार आहेत.पुढे उर्वरित जागा दुसऱ्या टप्यात भरल्या जाणार आहेत. पोलीस भरती होणार म्हटल्यावर बेरोजगार तरुणांमध्ये चैतन्य पसरले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार पहिल्या दुसऱ्या टप्यातील पोलीस भरती झाल्यानंतर गरज पडल्यास अजून पोलीस भरती करण्यात येईल.

दरम्यानच्या काळात एसइबीसीच्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरती केली जाईल असेही अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.पण या निर्णयाला मराठा संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता.

पोलीस भरती होणार म्हणून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.मराठा आरक्षणामुळे पोलीस भरतीचा कालखंड काही काळ लांबला होता.

अनिल देशमुखांच्या आज केलेल्या घोषणेनंतर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असली तरी मराठा संघटना त्या बाबतीत कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24