अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- पारंपरिक प्रथेला छेद श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे पोटच्या सहा मुलींनीच आईच्या निधनानंतर सर्व सोपस्कार पार पाडल्याची घटना घडली.
या पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या तर अनेकांनी याची वाहवा केली. आशाबाई भाऊसाहेब मुठे (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पोटी सहाही मुलीच आहेत.
त्यातील एकीने तिरडी धरत चौघी खांदेकरी झाल्या. सहावीने फेर्या मारताना घागरीला हात लावला. मयत आशाबाईस सहा मुली असून मीना राजेंद्र नळे हिने हातात तिरडी धरली,
शालिनीताई बाळासाहेब मात्रे, रंजनाताई कैलास शिंदे, सुरेखा गणेश भुसाळ, मंगल पोपट कर्डिले, सहावी मनिषा रमेश शेळके हिने तीन फेर्या मारताना घागरीला हात लावला,
असे विधीचे सर्व सोपस्कार महिलांनीच पूर्ण केले. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत असताना ग्रामस्थांसह उपस्थित नातेवाईक चकीत झाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved