महाराष्ट्र

ब्रेकिंग ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

Published by
Ahmednagarlive24 Office

Panjabrao Dakh Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात. खरे तर, गेल्या काही महिन्यांपासून राज्यावर सातत्याने अवकाळी पावसाचे ढग गडद होत आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता आणि या चालू वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. पण गेल्या तीन ते 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव उत्तमराव डख यांनी राज्यातील हवामानासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

पंजाबरावांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे मत व्यक्त केले आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी येत्या काही दिवसात गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संबंधित राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याने आपल्या महाराष्ट्रातही याचा विपरीत परिणाम पाहायला मिळणार आहे.

राज्यात 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये राज्यातील नागपूर, वर्धा, भंडारा, अचलपूर, अकोट, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, पुसद, हिंगोली, वाशिम, बुलढाणा या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.

विशेष बाब अशी की या कालावधीत उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नाही. दुसरीकडे या कालावधीत मराठवाड्यातील हिंगोली व परभणी जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

मात्र मराठवाड्यात पडणारा हा अवकाळी पाऊस खूपच तुरळक स्वरूपाचा राहणार आहे. तथापि पंजाबरावांनी 25 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यानंतर राज्यातील हवामानात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे संभाव्य गारपीटीची शक्यता लक्षात घेता अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे.

विशेष म्हणजे हा अवकाळी पाऊस फक्त पूर्व विदर्भातच पाहायला मिळणार आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कुठेच अवकाळी पाऊस होणार नाही असा अंदाज आहे. फक्त मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात व आजूबाजूच्या परिसरात तुरळक पावसाची शक्यता आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office