अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यात खुडसरगाव येथे एका शेतकऱ्याचा दोन एकर ऊस आग लागून जळाला.

बाळासाहेब पवार असे या शेतकऱ्याचे नाव असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने सदर घटना घडल्याचे प्रथमदर्शनी समजते.

या शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संपूर्ण परिसरात मेनलाईन असलेल्या तारा शेतात लोंबकळतात. अनेक ठिकाणी लोंबकळणार्‍या तारा तशाच असून महावितरणच्या कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष झाल्याने अशा अनेक घटना घडल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी खुडसरगाव शिवारात पवार यांच्या शेतातील मेनलाईनचा फॉल्ट होऊन दोन एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी बाळासाहेब पवार यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24