अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- नवीन कार घ्यायची म्हटल्यावर तिच्यासाठी प्रतीक्षा कारवी लागते. देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्या असणाऱ्या मारुती आणि ह्युंदाई. त्यांची वेटिंग लिस्ट सुरु केली आहे.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आहे. त्यांनी त्यांचे उत्पादन पूर्ण क्षमतेने घ्यायला सुरुवात केली आहे. आज या कंपनीच्या मॉडेलसाठी पण वेटिंग लिस्ट राहणार आहे. या कंपनीची एखादी कार घेण्यासाठी आपल्याला ३ किंवा ४ महिने थांबवा लागू शकते. नवीन वाहन करणाऱ्यांची संख्या पण आता वाढत चालली आहे.
त्यातल्या त्यात भर म्हणून वाहनावर कर्जाचे कमी व्याजदर लावले जाते. मात्र मागणीच्या प्रमाणात गाड्या नसल्यामुळे ग्राहकांना वेटिंग ला थांबावे लागते. ह्युंदाई आणि मारुती सुझुकी यांच्या गाड्या प्रामुख्याने जास्त प्रमाणावर विकल्या जातात. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादनात कंपन्यांनी वाढ केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याची दखल कंपन्यांनी घेतली असून उत्पादन वाढविण्याला पण काही प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. आपल्या या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.