मुंबई : महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार उद्या होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 अशा 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
आता उद्या दुपारनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित झालं आहे. यानुसार उद्या शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत.